मुले चोरून विक्री करणाऱ्या महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017
मुंबई - भीक मागण्याचे नाटक करून मूल चोरणाऱ्या महिलेला निर्मलनगर पोलिसांनी सोमवारी (ता. 12) गजाआड केले असून न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली आहे. झायरा गफारबेग शेख असे तिचे नाव असून पोलिस तिची कसून चौकशी करत आहेत.
मुंबई - भीक मागण्याचे नाटक करून मूल चोरणाऱ्या महिलेला निर्मलनगर पोलिसांनी सोमवारी (ता. 12) गजाआड केले असून न्यायालयाने तिला पोलिस कोठडी सुनावली आहे. झायरा गफारबेग शेख असे तिचे नाव असून पोलिस तिची कसून चौकशी करत आहेत.

खारच्या निर्मलनगर येथून एका बालिकेचे अपहरण झाले होते. तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली. शेखने त्या बालिकेला शीव येथे राहणाऱ्या फहीम अन्सारी आणि गुलशन जहॉ हफीम शेखला साडेतीन हजार रुपयांत विकले होते. बालिकेचे अपहरण करून तिची विक्री केल्याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. अटक करून त्या मुलीला तिच्या नातेवाईकांकडे सोपवले. दरम्यान, घटनास्थळाचे सीसी टीव्ही छायाचित्रण पोलिसांना मिळाले होते. शेख ही भेंडीबाजार परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तीन दिवस पोलिस तेथे सापळा लावून होते. सोमवारी (ता. 12) शेख पुन्हा बेहरामपाड्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शेखही पुन्हा मूल चोरण्याच्या बेतात असतानाच तिला उपनिरीक्षक धोत्रे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत शेखने मूलचोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तिने यापूर्वी किती मुले चोरली आहेत याचा पोलिस तपास करत आहेत.

मुंबई

मुंबई: अश्विन शुद्ध पक्ष प्रतिपदा आदिशक्ति दुर्गा मातेच्या महोत्सवास दक्षिण मुंबईत वरुणाच्या जलाभिषेकाने हर्षोल्हासात आज (गुरुवार...

04.27 PM

मुंबई - मुंबईला मंगळवारी (ता.20) रात्रीपर्यंत तुफानी हिसका दाखवणाऱ्या पावसाने बुधवारीही मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड...

06.03 AM

नवी मुंबई -  महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा "जोरात' जाणार असून, स्थायी समितीपाठोपाठ...

03.12 AM