महिला तस्करीचा तपास हा अत्यंत संवेदनशीलपणे व्हायला हवाः लक्ष्मीनारायण

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबईः महिला तस्करीचा तपास हा अत्यंत संवेदनशीलपणे व्हायला हवा, असे महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी म्हटले आहे.

मुंबईः महिला तस्करीचा तपास हा अत्यंत संवेदनशीलपणे व्हायला हवा, असे महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिला तस्करीवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्रीपंकजा मुंडे, अभिनेता अक्षयकुमार, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर, इंटरनॅशनल जस्टिस मिशन इंडियाचे मुख्य अधिकारी गॅरी हॉगेन आणि सेकंड लेडी ऑफ घाना हाजिया सामिरा बावुमिया आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग (एमएससीडब्ल्यू) व इंटरनॅशनल जस्टिस मिशन इंडिया (आयजेएम) यांच्या संलग्नतेने जुहू येथील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेल येथे आयोजित केलेल्या या परिषदेमध्ये ३०० वक्ते आणि १५ हून अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. आज दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी महिला तस्करी आणि कायद्याने होणाऱ्या पोलिस कारवाया या संदर्भात आपले विचार मांडताना या विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

महिला तस्करी विरोधी कायद्याची अंमलबजावणी, करण्यासाठी पोलिस, प्रोसीक्यूटर या बद्दल कोणत्या प्रकारचे काम करायला पाहिजे या बद्दल चर्चा होत आहे. जो काही उपलब्ध कायदा आहे त्याची कडक अंमल बजावणी पोलिसांकडून होत आहे. ख़ास करुन समाज म्हणून प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडायला पाहिजे. उपलब्ध कायद्यानुसार कायद्याची अंमल बजावणी करताना या महिला तस्करी गुह्यांचा तपास करताना फार संवेदनशील पद्धतीने तपास करावा लागतो. समाजामध्ये घडणाऱ्या अशा गोष्टी असल्यास आपल्या घरात असे काही घडल्यास ज्या पद्धतीने आपण तपास करतो त्याच संवेदनशील पद्धतीने तपास करायला पाहिजे. बऱ्याचशा स्वयंसेवी संस्था आहेत. त्या या महिला तस्करी विरोधात चांगले कार्य करीत असून, त्यांच्या कामात नागरिकांनी सहाय्य करायला पाहिजे. एक जबाबदार नागरीक म्हणून आपण समाज हिता संदर्भात बोलणे आवश्यक आहे. या समस्येला सर्वानी मिळून निराकरण करायला पाहिजे, असेही लक्ष्मीनारायण म्हणाले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: