स्वच्छतागृह वापरासाठी महिलांकडून तीन रुपये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नवी मुंबई - वाशी रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी महिलांकडून तीन रुपये घेतले जात आहेत. यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे. एकीकडे राईट टू पी चळवळ सक्षम होत असताना अशा प्रकारे शुल्कवाढ करून वेठीस धरले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

वाशी रेल्वेस्थानकातील सार्वजनिक शौचालय संघटनेला चालवण्यासाठी दिले आहे. तेथे लघुशंकेसाठी दोन रुपये घेतले जात होते; मात्र आता तीन रुपये घेतले जात आहेत. याबाबत संबंधितांना विचारले असता, शुल्कवाढ केल्याचे त्यांनी सांगितले; मात्र लघुशंकेसाठी तीन रुपये घेणे चुकीचे आणि अन्यायकारक असल्याचे महिलांनी म्हटले आहे.

राईट टू पी चळवळीत लघुशंकेसाठी मोफत प्रवेश मिळावा, अशी मागणी होत आहे; मात्र येथे चक्क तीन रुपये घेतले जात असल्याने महिलांनी कारवाईची मागणी केली आहे.