योग प्रशिक्षकाला विनयभंगप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई - योग प्रशिक्षण वर्गात येणाऱ्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिवराय राऊत या योग प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची 15 हजारांच्या जामिनावर सुटका केली. राऊत अनेक वर्षांपासून शिवडीतील पालिका शाळेत योग प्रशिक्षणाचे वर्ग घेत असे. तक्रादार महिला गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून कुटुंबासह त्याच्या वर्गात येत होती.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राऊत याने त्या महिलेला त्याच्या प्रशिक्षण केंद्रात योग शिकवण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्या मोबाईलवर अश्‍लील संदेश पाठविण्यास सुरवात केली. त्या महिलेने प्रशिक्षण वर्गात काम करणे सोडल्यानंतरही तो तिला वारंवार फोन करून त्रास देत होता. गेल्या 20 एप्रिलला त्याने तिच्या घरी जाऊन तिच्याशी गैरवर्तन केले. तिने पतीला याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवली.

टॅग्स

मुंबई

नवी मुंबई  - भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी दुपारपासून नवी मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली...

08.09 PM

मुंबईः विजांच्या कडकाडाटासह सुरू झालेल्या पावसाने 29 जुलैची मुंबईकरांना आठवण करून दिली. शहरात 28.71 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 28.93...

06.36 PM

ठाणे: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल इब्राहीम कासकर याने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकांना फोन करून...

04.24 PM