घाटकोपरमध्ये तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

घाटकोपर - साकी नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परेरा वाडी येथे वाढदिवसाचे होर्डिंग फाडल्याचा राग मनात ठेवून एका तरुणाचा खून करण्यात आला. प्रल्हाद शेट्टी या केबल व्यावसायिकाचा रविवार (ता. ५) वाढदिवस होता. त्यानिमित्त शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी साकीनाका परिसरात होर्डिंग लावले. त्यातील एक होर्डिंग आकाश लांडगे याने फाडले असल्याच्या संशयावरून मंगळवारी (ता. ७) रात्री १० च्या सुमारास आकाशला प्रथमेश शेट्टी आणि त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. जखमी आकाशला पोलिस राजावाडी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या खुनामुळे परेरा वाडीत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

घाटकोपर - साकी नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या परेरा वाडी येथे वाढदिवसाचे होर्डिंग फाडल्याचा राग मनात ठेवून एका तरुणाचा खून करण्यात आला. प्रल्हाद शेट्टी या केबल व्यावसायिकाचा रविवार (ता. ५) वाढदिवस होता. त्यानिमित्त शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी साकीनाका परिसरात होर्डिंग लावले. त्यातील एक होर्डिंग आकाश लांडगे याने फाडले असल्याच्या संशयावरून मंगळवारी (ता. ७) रात्री १० च्या सुमारास आकाशला प्रथमेश शेट्टी आणि त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. जखमी आकाशला पोलिस राजावाडी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या खुनामुळे परेरा वाडीत दहशतीचे वातावरण पसरले आहे. आरोपी प्रथमेश शेट्टी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. आकाश लांडगे हा तडीपार आरोपी होता. त्यामुळे होर्डिंगचे कारण समोर येत असले तरी यामागे गॅंगवॉर दडले असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स