मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जात उतरला तरुण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

दरम्यान, या प्रकारामुळे मंत्रालयामधील सर्व काम ठप्प झाले असून इमारतीखाली व इमारतीच्या आवारामध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी झाली आहे. पोलिस या युवकाच्या मागण्या समजून घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आलेल्या एका युवकाने आज (शुक्रवार) मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. हा युवक गेल्या अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळापासून सातव्या मजल्याच्या सज्जावर उभा आहे. पोलिस त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री वा कृषीमंत्र्यांना भेटावयास मिळावे, अशी या युवकाची मागणी आहे. मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील सज्जावर उडी मारल्यानंतर या युवकाने आपला मोबाईल नंबर खाली फेकला. त्या मोबाईल नंबरवरून पोलीसांनी त्याच्याशी संवाद साधला.

दरम्यान, या प्रकारामुळे मंत्रालयामधील सर्व काम ठप्प झाले असून इमारतीखाली व इमारतीच्या आवारामध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी झाली आहे. पोलिस या युवकाच्या मागण्या समजून घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.