मुंबईत "यूपी पॅटर्न'ची चर्चा 

सिद्धेश्‍वर डुकरे - सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 19 जानेवारी 2017

मुंबई - उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस व समाजवादी पक्ष यांची युती होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अशी युती झाल्यास स्थानिक समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. 

मुंबई - उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस व समाजवादी पक्ष यांची युती होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अशी युती झाल्यास स्थानिक समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. 

उत्तर प्रदेशात कॉंग्रेस पक्षासोबत आघाडी करून जागा वाटपाची चर्चा चालवली आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षांची आघाडी झाली तर त्याचा राजकीय लाभ या दोन पक्षांना मिळणार आहे. अशी आघाडी झाल्यावर कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षांच्या उमेदवारांना मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मते एकगठ्ठा मिळण्याची शक्‍यता राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे. या शिवाय उत्तर भारतीय आणि बिहारींचे मुंबईत लक्षणीय मतदान आहे. ही मतेसुद्धा या दोन्ही पक्षांना मिळण्याची दाट शक्‍यता आहे. 

कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षांची आघाडी झाली तर एमआयएम पक्षापुढे आव्हान उभे राहील. एमआयएम हा पक्ष जितकी जास्त मते घेईल तितके जास्त नुकसान कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाचे होणार आहे, तर तितका जास्त फायदा भाजप आणि शिवसेनेला होणार आहे. कारण भाजप आणि शिवसेनेला मुस्लिम मतदार तितकीशी पसंती देत नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष यांची आघाडी झाली, तर ती या दोन्ही पक्षांच्या पथ्यावरच पडणार आहे. 

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेस आघाडी झाली आहे. येथे चर्चेसाठी ते आले तर नक्‍कीच विचार करू. मात्र अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही. 
- संजय निरुपम, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष 

कॉंग्रेसने आम्हाला चर्चेला बोलावले, तसा प्रस्ताव आला तर नक्‍कीच विचार केला जाईल. 
अबू आझमी, समाजवादी पक्षाचे आमदार 

Web Title: Mumbai UP pattern discussion