पोलिसांचा कौल शिवसेनेला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबईत कोणालाच बहुमत मिळणार असे चित्र असले तरी देशातील सर्वात श्रीमंत पालिकेत पुन्हा शिवसेननेला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज पोलिसांच्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. 2012 मध्ये 76 जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला यंदा 90- 95 ठिकाणी विजय मिळेल. त्यामुळे त्या पक्षाला सत्ता मिळवण्यासाठी कुणाची तरी मदत घ्यावी लागेल, असे हा अहवाल सांगतो. भाजपच्याही जागांत वाढ होण्याची शक्‍यता आहे. या पक्षाला 65-80 जागा मिळतील. या दोन पक्षांचा अपवाद वगळता अन्य पक्षांच्या जागा कमी होतील, असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

पोलिसांचा होरा
........ 2017 .... 2012
शिवसेना - 90-95 .... 76
भाजप - 65 - 80....
कॉंग्रेस - 30-35...... 51
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 10-13....
मनसे - 8-10 .... 27
एमआयएम - 5-7.....0
समाजपादी पक्ष - 2-5.... 7

अशी काम करते यंत्रणा
पोलिसांच्या विशेष शाखेच्या प्रत्येक विभागाचे त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या मतदारसंघांवर बारीक लक्ष असते. शहरातील सभा, नागरीकांचा कल यांची नियमित माहिती घेऊन ती वरिष्ठांना देण्यात येते. इतरही विशेष विभाग या शाखेत कार्यरत असतात. शहरातील प्रत्येक विभागात माहिती घेऊन हा निष्कर्ष मांडण्यात येतो. त्यामुळे पोलिसांचा हा अंदाज शक्‍यतो अचूक ठरतो.

Web Title: mumbai police predicts shivsena win