मुंबई : भायखळा रेल्वे स्थानकाला नवे रूप

स्थानकाचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले.
 भायखळा रेल्वे
भायखळा रेल्वे sakal

मुंबई : भायखळा रेल्वे स्टेशनला मूळ गॉथिक, वारसा, वास्तू वैभव देण्यासाठी मागील तीन वर्षांपासून काम सुरू होते. अखेर हे काम पूर्ण झाले असून पुन्हा नव्याने कौलारू छप्पर असलेले, दगडी भिंती असलेले भायखळा स्थानक जिवंत झाले आहे. या स्थानकाचे लोकार्पण शुक्रवारी (ता. २९) करण्यात आले.

भायखळा स्थानकाचे लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आय लव्ह मुंबईचे विश्वस्त शायना एन.सी, बजाज ग्रुप आणि जमनालाल बजाज फाऊंडेशनचे मीनल बजाज आणि निरज बजाज, हेरिटेज कॉन्झर्व्हेशन आर्किटेक्ट आभा नारायण लांबा, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी उपस्थित होते.

यावेळी दानवे म्हणाले की, रेल्वे १०० टक्के विद्युतीकरणाकडे वाटचाल करत असून २०२३ पर्यंत हे उद्दिष्ट गाठणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला नीती आयोगाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील २८ रेल्वेस्थानके अपग्रेडेशनसाठी निश्चित केली आहेत.

रेल्वे स्थानके आणि स्वच्छतेतही उल्लेखनीय बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भायखळा हे भारतातील सर्वात जुने रेल्वेस्थानक आहे. संपूर्ण नियोजनबद्धरित्या अंमलबजावणीचे काम पूर्ण झाले आहे. भायखळा रेल्वेस्थानक त्याच्या प्राचीन, वारसा वास्तुकला उत्कृष्टतेने जवळपास पुनर्संचयित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com