मुंबईत रेल्वे वाहतुकीचा खोळंबा; प्रवाशी त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

मुंबई- मध्य रेल्वेची वाहतूक मुंबईमध्ये विस्कळीत झाल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. भिवपुरी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्य़ाने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. 

दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या डी.आर.एमला बदलापूरला जाण्याचे आदेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी दिले आहेत. तसेच मध्ये रेल्वेने प्रवाशांना आंदोलन मागे घेण्याचे आदेश दिलेत. 

सकाळपासून लोकची वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येते. ऑफिसच्या वेळेत रेल्वेचा असा खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून संपप्त भावना उमटू लागल्या. दरम्यान संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्टेशनवर लोकल थांबवली. आणि स्टेशन मास्तरच्या ऑफिसला घेराव घातला. रोज रोज होणाऱ्या या नाहक त्रासावर तोडगा काढण्याची मागणी यावेळी प्रवाशांनी केली.

टॅग्स