कंबरभर पाण्यात नागरिकांची तारांबळ 

कंबरभर पाण्यात नागरिकांची तारांबळ 

मुंबई - रविवारी गुडूप झालेल्या पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण करून मुंबईचा वेग रोखला. सकाळचा प्रवास कित्येकांना पायीच करावा लागला. कंबरेहून अधिक पाण्यातून प्रवास करताना मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, वांद्रे येथे एक तरुण नाल्यात वाहून गेला.

पावसात बंद पडण्याच्या भीतीने बहुतांश भागांत रिक्षा बंद होत्या. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेत जवळपास दोन तास कित्येक भागांत रस्ते वाहतूक ठप्प होती. पश्‍चिम द्रुतगती मार्गावर धीम्या गतीने वाहतूक सुरू होती.

दुसरीकडे, रात्रभर सुरू असलेल्या पावसाने शीव स्थानकाजवळ पाणी साचून मध्य रेल्वेही काही काळ बंद पडली होती. हार्बर मार्गावरही अशीच परिस्थिती होती. पावसाचा जोर ओसरल्यावर लोकल वाहतूक सुरू झाली, तरी गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.  

‘कमला मिल’मध्ये पुन्हा आग
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये मंगळवारी पुन्हा आगीची ठिणगी पडली. तेथील ट्रेड बिल्डिंगच्या बी विंगमध्ये लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आटोक्‍यात आणली. दुसरीकडे सांताक्रूझ येथे डबल डेकर बस ओव्हरहेड बॅरिअरला धडकल्याने बसचे नुकसान झाले.  

शाळांची लवकर सुट्टी
सकाळपासून जोरदार पडणारा पाऊस आणि अंधेरी रेल्वेस्थानकाजवळील पूल कोसळल्याने चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांनाही फटका बसला. 

दोन दिवस अतिवृष्टी?
पुढील दोन दिवस शहर भागांत तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com