दुपारपासून सरकारी कार्यालये ओस 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

मुंबई : मुंबई-ठाण्यासह अन्य ठिकाणी कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि वेधशाळेने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मंत्रालयासह अन्य सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दुपारी घरी जाण्यास सामान्य प्रशासन विभागाने मुभा दिली. त्यामुळे दुपारनंतर सर्व सरकारी कार्यालये ओस पडली होती. 

भारतीय हवामान खात्याने मंगळवारी (ता. 29) दुपारी 1 वाजता पुढील 4 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अलिबाग, डहाणू परिसरात, तर पुढील 48 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला.

मंत्रालयातील आणि दक्षिण मुंबईतील सरकारी कार्यालयातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी पश्‍चिम रेल्वे, मध्य आणि हार्बर रेल्वे; तसेच बसद्वारे प्रवास करतात. मंगळवारी दिवसभर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. परिणामी मंत्रालयातील आणि बृहन्मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दुपारी 2.30 वाजता कार्यालय सोडण्यास अनुमती देण्यात आली.