नागरिकांना मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना निर्देश 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

मुंबई : पावसामुळे ठप्प झालेल्या मुंबई-ठाण्यातील नागरिकांना सर्वतोपरी मदत करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई विभागीय भाजपचे अध्यक्ष ऍड्‌. आशीष शेलार यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. 

मंगळवारी (ता. 29) सकाळपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि ठाणे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. उपनगरी रेल्वे आणि रस्त्यांवरील वाहतूक बंद पडल्याने कामानिमित्त सकाळी घराबाहेर पडलेले लाखो नागरिक अडकून पडले आहेत.

त्यांना गणशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते आणि पदाधिकारी मदत करत आहेत. सोशल मीडियावरून ही मंडळी अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करत आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि शेलार यांनीही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मदतीसाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. शेलार यांनी संरक्षणासाठी तैनात पोलिसांनाही नागरिकांच्या मदतीसाठी पाठवण्याचे आवाहन मुंबई पोलिस आयुक्‍तांना केले आहे.

Web Title: mumbai rains mumbai monsoon mumbai news marathi news Devendra Fadnavis BJP