कोहलीकडून खारघरच्या स्वतिकाला टेबल टेनिससाठी शिष्यवृत्ती

अनुष्का शर्मा, विराट कोहली स्वस्तिका
अनुष्का शर्मा, विराट कोहली स्वस्तिका

खारघर : मुलींच्या खेळात प्रगती व्हावी यासाठी शिक्षकाची नोकरी सोडून तिला प्रशिक्षण दिले आणि तिनेही वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करून कोलंबो येथे पार पडलेल्या दक्षिण आशियाई फेडरेशन चम्पियन स्पर्धेत सुवर्ण आणि अमन येथील जॉर्डन टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त करून तिने खारघर तसेच शाळेचे नाव केले. त्यांचे खेळ पाहून विराट कोहली फाउंडेशनकडून तीन वर्षांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

शिष्यवृत्ती मिळाल्याने खूप आनंद वाटत असल्याचे टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष यांच्या वडिलांनी सकाळ सी बोलताना सांगितले. स्वस्तिका सध्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत आहेत. तर स्वस्तिका घोष हिने 2020 साली होणाऱ्या ऑलम्पिकच्या निवडीसाठी सराव सुरु असल्याचे सकाळला सांगितले.

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणारी युवा टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिचे वडील संदीपान घोष हे टेनिस खेळाडू आहेत. स्वस्तिका ही बालवयात खेळ म्हणून घरी टेनिस खेळत असे,तिच्या खेळण्याची आवड पाहून वडिलाने तिला टेनिसचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तसेच शाळेतही टेनिस खेळला जात असल्यामुळे सरावास गती मिळाली. तिचे उज्वल भविष्य टेनिस खेळात आहे. आणि तिला प्रशिक्षणासाठी बाहेर पाठविल्यास प्रशिक्षणाचा खर्च पेलवणार नाही. हे ओळखून तिच्या वडिलांनी सेंट अगस्टीन शाळेतील शिक्षकाची नोकरी सोडून तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तिने शाळेकडून खेळताना तालुका,जिल्हा स्तरावर तसेच गोरेगाव स्पोर्ट्स क्लब मालाड मुंबई येथील टेनिस स्पर्धा गाजविली .  19 वर्षे वयोगटा खालील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद रायगड स्पर्धेत शाळेला सुवर्ण पदक मिळवून दिले. त्याच वेळी तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. आणि तिने कोलंबो येथे पार पडलेल्या साऊथ एशियन फेडरेशन चम्पियन स्पर्धेत सुवर्ण आणि अमन येथे पार पडलेल्या जॉर्डन टेबल टेनिस स्पर्धेत कास्य पदक प्राप्त करून नाव लौकिक केले. टेबल टेनिस खेळात केलेल्या प्रगती पाहून तिला रायगड भूषण पुरस्कार,पुण्याचा सुदेश शेलार कडून दिले जाणारा अंजली भागवत (अर्जुन पुरस्कार ) देवून गौरविण्यात आले आहेत.

अशी झाली निवड 
देश भरातून विविध क्षेत्रातील सात खेळाडूची निवड झाली आहेत. त्यात महाराष्ट्रातून स्वस्तिका घोष एकमेव खेळाडू आहेत. गेल्या दोन वर्षात घोष हिची राष्ट्रीय निवड होताच तिने इंडियन नॅशनल रँकिंग्जच्या विविध स्पर्धा, टीम इंडियामध्ये चैम्पियन प्रदर्शन,कोलंबो येथे पार पडलेल्या साऊथ एशियन फेडरेशन चम्पियन स्पर्धेत सुवर्ण आणि अमन येथे पार पडलेल्या जॉर्डन टेबल टेनिस स्पर्धेत कास्य पदक प्राप्त केले. तिचे खेळ पाहून पिटी उषा,अंजली भागवत अश्या काही नावाजलेल्या खेळाडूंनी टेनिस खेळात स्वस्तिका घोष देशाचे नाव उज्वल करू शकते. हे पाहून तिची विराट कोहली फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. तीन वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

रामशेठ ठाकूर शैक्षणिक संस्थेकडून आर्थिक मदत 
स्वस्तिका घोषचे वडील संदीप घोष म्हणाले देश तसेच विदेशात टेनिस खेळासाठी रामशेठ ठाकूर यांनी अनेक वेळा आर्थिक मदत केल्यामुळे हे शक्य झाले. स्वस्तिकाच्या खेळावर विदेशात प्रशिक्षण व इतर वार्षिक जवळपास वीस लाख रुपये येतो. विराट कोहली फाउंडेशन कडून तीन वर्षे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यामुळे खूप मदत होणार आहे.

मला अभिमान वाटतो- प्राचार्य 
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी म्हणाली ,माझी विध्यार्थी काही वर्षात देशासाठी खेळताना दिसेल असा माझा तिला आशीर्वाद आहे. तिने खारघर शहर आणि शाळेचे नाव केल्यामुळे तिच्या खेळातील प्रगती पाहून मला अभिमान वाटते.  

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com