ठाण्यात 10 लाख 74 हजारांच्या बनावट नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

ठाणे : ठाण्यातील कळवा येथे शनिवारी मध्यरात्री ठाणे पोलिसांनी सापळा रचून 10 लाख 74 हजारांच्या नकली नोटांसाहित आरोपी दशरथ प्रसाद भोलू (36) याला अटक केली.

आरोपी दशरथ भोलू हा राजिया बिल्डिंग, नं. १०१, मुब्रा येथे राहत असून गेल्या अनेक दिवसांपासून बनावट नोटांचे हेराफेरी करीत असल्याचे पोलिस गुप्तचर यंत्रणेला कळले असल्याने अखेरीस ठाणे क्राईम ब्रँचच्या पथकाने सापळा रचून छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे शनीवारी रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी भोलू यास मुद्देमालासह अटक केले.

यावेळी त्याच्याकडे बनावट नोटा सापडल्या. जप्त केलेल्या 537 नोटा 2 हजार रुपये किमतीच्या आहेत . अधिक तपास युनिट 1 चे अधिकारी करीत आहेत.

टॅग्स