मुंबईतील सराईत चोरट्याला ठाण्यात अटक ; 11 दुचाकी, मोबाईल हस्तगत

मुंबईतील सराईत चोरट्याला ठाण्यात अटक ; 11 दुचाकी, मोबाईल हस्तगत

ठाणे : मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक दुचाकी चोरणाऱ्या नासीर खान (रा. विक्रोळी-पार्कसाईट) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 11 दुचाकी, दोन मोबाईल आणि दुचाकीच्या 17 चाव्यांसह इतर सामग्री हस्तगत करण्यात आली. त्याच्याविरोधात मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत दुचाकी चोरीचे 39 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 

घोडबंदर रोडवरील हिरानंदानी परिसर, कासारवडवली भागात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे चोरट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. याचदरम्यान मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात दुचाकी चोरणाऱ्या नासीरची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या पथकाने हिरानंदानी स्कूलसमोर दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या नासीरला अटक केली. सुरुवातीला त्याला तीन दिवस पोलिस कोठडी मिळाल्यानंतर शुक्रवारी आणखी एका गुन्ह्यात अटक करण्यात आली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com