शुक्रवारपासून मुंबईतील महाविद्यालये ऑनलाईन सुरु; वाचा सविस्तर

शुक्रवारपासून मुंबईतील महाविद्यालये ऑनलाईन सुरु; वाचा सविस्तर

मुंबई ः मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षास 7 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मात्र सध्या केवळ ऑनलाईन लेक्चर होणार आहेत. पदवीच्या पहिल्या वर्षाच्या तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम सोडल्यास सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

सर्व महाविद्यालयांनी ऑनलाईन अभ्यासक्रमांस सुरुवात करावी. पदवी तसेच पदव्युत्तर वर्गाच्या प्रथम वर्ष अर्थात पहिले सत्र यास अपवाद असेल. विविध फॅकल्टी अंतर्गत असलेल्या प्रोग्रॅमची माहीती स्वतंत्रपणे कळवण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने कळवले असल्याचे वृ्त्त आहे. 

मुंबई विद्यापीठाने यापूर्वी 31 ऑगस्टला पत्रक काढून महाविद्यालतली प्रवेशाचे नियम सांगितले होते. सध्या शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्यात आले आहे. त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता कोणतीही प्रवेश नव्याने दिले जाणार नाहीत 

महाविद्यालयांना सध्या शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना द्वितीय, तृतीय, चतुर्थ तसेच पाचव्या वर्षात प्रवेश देण्यास सांगितला आहे. त्याचबरोबर त्यांना बाहेरील तसेच एक्स्टर्नल विद्यार्थ्यांना प्रवेश देताना क्षमता न ओलांडण्याची सूचना देण्यात आली होती. त्याचबरोबर सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमोट करताना कक्ष न वाढवण्याची सूचना आहे. कक्ष वाढवल्यास त्याचा अतिरीक्त ताण प्राध्यापकांवर पडेल. दरम्यान पदवीसाठीची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे. 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com