विद्यापीठाचे प्रश्‍न मार्गी लावू - शरद पवार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाचे प्रश्‍न मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मार्गी लावू, असे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पक्षाच्या विद्यार्थी सेलच्या शिष्टमंडळाला दिले. राष्ट्रवादीच्या या सेलच्यावतीने मुंबई विद्यापीठातील समस्यांचा पाढा पवारांसमोर वाचून दाखवला, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे अमोल मातेले यांनी दिली. 

मुंबई विद्यापीठाची देशांतर्गत क्रमवारी पहिल्या दीडशे विद्यापीठांमध्येही नाही. यामुळे नाच्चकी होत आहे. याला राज्य सरकार कारणीभूत असून विद्यापीठ प्रशासन हे विद्यार्थिभिमुख कामगिरी बजावत नाही, याचा फटका विद्यार्थांना बसत आहे. विद्यापीठाच्या कारभारात कसलीही प्रगती दिसत नाही. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. उत्तरपत्रिका घोटाळा, निकालात दिरंगाई, गुणपत्रिकेचा घोळ, किचकट ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, यामुळे लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. विद्यापीठाच्या कुलपतींनी या बाबींकडे लक्ष देणे अपेक्षित असताना कोणतेही ठोस धोरण घेतल्याचे दिसत नाही, आदी प्रकारांमुळे विद्यापीठाची क्रमवारी घसरल्याचे विद्यार्थी सेलने निदर्शनास आणून दिले. विद्यापीठ हे प्राध्यापक व कामगार केंद्रित झालेले आहे, अशी तक्रार केली जात आहे. ज्या विद्यार्थांच्या जीवावर विद्यापीठाचा कारभार चालतो तो विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या बाहेर आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची भीक मागत उभा असतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

"महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016' नुसार विद्यापीठ परीक्षेचे निकाल त्या विशिष्ट परीक्षेच्या अखेरच्या दिनांकापासून 30 दिवसांत जाहीर करण्याची तरतूद आहे, तर उशीर झाल्यास 45 दिवसांत घोषित करणे अनिवार्य आहे; मात्र शंभर दिवसांनंतरही निकाल लागत नाहीत, त्याशिवायच पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली जाते. विशेषतः आयडोल, एम. कॉम, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसल्याचे मातेले यांनी सांगितले आहे. शरद पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे सांगितले. 

Web Title: mumbai university issue sharad pawar