मुंबईकरांतील खवय्यांचा आढावा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

"गॉर्ब'कडून सर्वेक्षण; 35 टक्के नागरिकांची मटणाला पसंती 

"गॉर्ब'कडून सर्वेक्षण; 35 टक्के नागरिकांची मटणाला पसंती 

मुंबई: मुंबईमध्ये अठरापगड जाती-जमातींचे रहिवासी आहेत. मुंबईचा प्रत्येक परिसर ठरावीक समुदायावरून ओळखला जातो. केवळ मराठीच नाही तर इतर भाषकही मुंबईत स्थिरावले आहेत. त्यामुळे पूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई यात अनेक बदल झाले आहेत. गॉर्ब या फूड चेनच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणानुसार मुलुंड, चेंबूरकरांची शाकाहाराला पसंती आहे. ग्रॅण्ट रोड, घाटकोपरमधील नागरिक मांसाहारावर ताव मारत असल्याचे दिसून आले आहे. 
पस्तीस टक्के मुंबईकरांनी पोर्क किंवा चिकनपेक्षा मटणाला अधिक पसंती दिली आहे. सहा महिन्यांमध्ये तब्बल तीन हजारहून अधिक जणांनी मटणाच्या विविध पदार्थांची चव घेतली आहे. मध्य मुंबईतील मुलुंड, माटुंगा, चेंबूर या पट्ट्यातील ग्राहकांनी शाकाहाराला; तर ग्रॅंट रोड, कांजूर मार्ग, मुंबई सेंट्रल परिसरातील खवय्यांनी माशांवर ताव मारणेच अधिक पसंत केले. वांद्रे परिसरातील ग्राहकांचा कल हेल्दी फूड खाण्याकडे आहे. दक्षिण मुंबईतील मारवाडी, सिंधी ग्राहकांनी क्वेल, क्विनोआ व अवाकाडो आदी पदार्थांना पसंती दिली आहे. जुलै 2016 ते जानेवारी 2017 दरम्यान सुमारे पाच लाख ऑर्डरनुसार हे सर्वेक्षण केल्याचे "गॉर्ब'ने स्पष्ट केले आहे. 
 

Web Title: mumbaikar likes mutton dishes