मुंबईचे तापमान आज ३५ अंशांवर?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - मुंबईतील तापमान पुन्हा वाढू लागले आहे. मंगळवारी (ता. १०) कमाल पारा ३५ अंश सेल्सिअसवर जाईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. दोन आठवड्यांपूर्वी उष्णतेची लाट सहन केल्यानंतर मुंबईचा कमाल पारा सरासरीच राहिला होता. दरम्यान, रविवारी राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाल्याने कमाल तापमानात घट झाली आहे. कोकणात मात्र हवामान बदलाचा कोणताच परिणाम न झाल्याने तापमानात वाढ होत असल्याचे निरीक्षण केंद्रीय हवामान विभागाने नोंदवले. मुंबईत मंगळवारी तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांनी वाढ होईल, असा अंदाज आहे.

Web Title: Mumbai's temperature is 35 degrees today