महापालिका अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतुदीची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

मुंबई - महापालिकेने महिलांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करताना महिलांसाठी संगणक साक्षरता प्रशिक्षण, तसेच प्रत्येक वॉर्डात महिला आधार केंद्र, पाळणाघर यासारखे व्यवसाय व महिला वसतिगृह बांधावे, अशी सूचना शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली. महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

मुंबई - महापालिकेने महिलांसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करताना महिलांसाठी संगणक साक्षरता प्रशिक्षण, तसेच प्रत्येक वॉर्डात महिला आधार केंद्र, पाळणाघर यासारखे व्यवसाय व महिला वसतिगृह बांधावे, अशी सूचना शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली. महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

मुंबईतील राईट टू पीबाबत गोऱ्हे यांनी महापालिका आयुक्त अजोय महेता यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत चर्चा केली. महिलाकेंद्रित विकास, आर्थिक धोरण या मुद्द्यांवर अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी जेंडर बजेट, फेरीवाल्यांचे धोरण, तसेच महिला मासेविक्रेत्यांच्या संदर्भात सविस्तर सादरीकरण केले. या वेळी शिवसेना सभागृहनेत्या तृष्णा विश्‍वासराव यांच्यासह पालिका उपायुक्त व अन्य अधिकारी उपस्थित होते. गोऱ्हे म्हणाल्या की, महापालिकेचे या संदर्भातील काम चांगले आहे. महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणे, महिला स्वयंरोजगार, महिला शेल्टर यांसह महापालिकेने अन्य योजना राबविल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने या वर्षी महिलाकेंद्रित अर्थसंकल्पात सार्वजनिक शौचालयासाठी 33 कोटी राखून ठेवले आहेत. त्याअंतर्गत बांधलेले शौचालय केवळ महिलांसाठी असावेत. महापालिकेतर्फे ज्या सामाजिक संस्था दिलासा केंद्र, महिला आधार केंद्र, शेल्टर होम चालवीत असतील त्या संस्थांची कार्यपद्धती अत्याधुनिक करून, त्याची क्षमता वाढविण्यावर भर देण्याची मागणी त्यांनी केली.

मुंबई

मुंबादेवी : आज रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत दक्षिण मुंबईची शान म्हणून ओळखला जाणारा "देव माझा उमरखाडीचा राजा" गणरायाची मिरवणूक...

09.54 AM

मुंबई - आमचा नंदीबैल दररोज शेकडो आबालवृद्धांना आशीर्वाद देतो... आज आमच्या कुटुंबाला त्याच्या आशीर्वादाची आवश्‍यकता आहे......

05.06 AM

ठाणे - ठाणे स्थानकात उभारण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी सॅटीस पुलाला गळती लागली आहे. पावसाचे पाणी थेट पुलाखालून मार्गक्रमण...

04.15 AM