मुंबईत मतदार याद्यांमध्ये गोंधळात गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मतदारांमध्ये उत्साह पण...  
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या ट्विटनुसार लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या कामात गोंधळ आणि कामात समन्वय नसल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे.

मुंबई - मुंबई, ठाणे, उल्हासनगर याठिकाणी मतदार याद्यांमधील गोंधळामुळे अनेक मतदारांना नाराजीचा सामना करावा. मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदानासाठीची प्रतिक्षा वाढतानाच रांगेत ताटकळत उभ राहण्याचाही अनुभव सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींना आला. काहींना तर मतदान न करताच घरी परतण्याची वेळ आली.

भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनाही मतदार यादीतील घोळाचा फटका यंदा सहन करावा लागला. अखेर मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी धावपळ करत त्यांच नाव शोधून काढल. तीन याद्या शोधून अखेर त्यांच नाव सापडले. याद्यांमध्ये नाव न सापडणे, नाव शोधण्यातील अडचणी आणि मतदार यादीतून नाव गायब असणे तसेच बोगस मतदानाच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या.

दक्षिण मुंबईत, घाटकोपर, वांद्रे आणि मुलुंडसारख्या परिसरात मतदार यादीमध्ये नाव सापडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना मतदारांचा रोष सहन करावा लागला. अनेक ठिकाणी मतदारांना नाव सापडत नसल्याने गोंधळणाचा वातावरण होत. वांद्र्यात 
पुर्नविकासाच्या इमारतीच्या स्थलांतरीत मतदारांची नाव यादीत न सापडण्याचे प्रकारही समोर आले. त्याठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे मतदार यादीत नाव नसल्याचे कारण पुढे करण्यात आले.

उल्हासनगरमध्येही मतदार यादीत नाव न सापडण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे मतदारांनी नावांची शोधशोध करताना गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. धारावी, अँण्टॉप हील, सायन कोळीवाडा परिसरात अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा प्रकार समोर आला. अॅंटॉप हिल परिसरातही मुस्लिम तरूण आणि पोलिसांमधील वादाचा प्रकार पुढे आला आहे. दहिसरमध्येही मतदार यादीत नाव न सापडल्याने अनेक मतदारांनी घरचा रस्ता धरला. 

मतदारांमध्ये उत्साह पण...  
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या ट्विटनुसार लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या कामात गोंधळ आणि कामात समन्वय नसल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे.

Web Title: municipal corporation election voting in Mumbai