मधुरांगणतर्फे मुरबाडमध्येही रंगणार मंगळागौर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुरबाड - महिलांचे हक्काचे आणि लाडके व्यासपीठ असणाऱ्या ‘सकाळ’, ‘मधुरांगण’तर्फे मुरबाड येथे ‘मंगळागौर’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी मोदक बनवण्याच्या स्पर्धा होणार असून, प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. मुरबाडचे नगराध्यक्ष किसन कथोरे, उप नगराध्यक्ष नारायण गोंधळी आणि तन्मय मॅटर्ननिटी हॉस्पिटल व नर्सिंग होम मुरबाडचे संचालक डॉ. जितेंद्र बेंडारी कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

मुरबाड पंचायत समितीच्या हुतात्मा हिराजी पाटील सभागृहात मंगळवारी (ता. २२) दुपारी ३ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम आहे. येथील मधुरांगण सदस्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. डोंबिवली येथील स्वामिनी महिला गट मंगळागौर सादर करणार आहे. स्थानिक महिलाही त्यांना साथ देणार आहेत. महिलांच्या पाककलेला प्रोत्साहन देण्यासाठी खास मोदक स्पर्धाही होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी योगिता नागरे ः ८२८६८४८७२२ यांच्याशी आणि कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी मुरबाड केंद्रप्रमुख नंदा गोडांबे ७८७५४०२९१५ आणि सुश्‍मिता तेलवणे ९६७३५३१९०१ यांच्याशी संपर्क साधावा.

तुम्हीही व्हा मधुरांगणच्या सदस्या
महिलांचे हक्काचे आणि आवडते व्यासपीठ असणाऱ्या मधुरांगण परिवारातील एक घटक होण्याची संधी महिलांना दिली जाणार आहे. सदस्यस्त्व वर्गणी फक्त ५९९ रुपये आहे. यात ७५० रुपयांपर्यंतचे हमखास गिफ्ट, तनिष्का मासिकाचे वार्षिक सभासदत्व आणि वर्षभर कार्यक्रमाची रेलचेल, कार्यशाळा व धम्माल सहली यांचा लाभ घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः योगिता नागरे ९६९९९७७३१७