'तलाक तो बहाना है, शरियत पे निशाणा है'

दिनेश चिलप मराठे
रविवार, 1 एप्रिल 2018

हमारी जमात मे छोडी हुई औरत ना के बराबर है. बेवा विधवा - तलाकशुदा औरतोंको आश्रम पुरे मुल्क मे नही है. शरियत हमारा दुनियाका बेहतरींन कानून है, यह औरतोंकी इज्जत करता है. हमे शरियत पर फ़क्र और नाझ है. हम यहा पे शरियत के मोहबबत के खातीर आये है.असे प्रतिपादन केले. आशिया शकील साहीबा (जमाते इस्लाम हिंद /मीडिया इंचार्ज) यांनी म्हटले की, इस्लाम ने हमे जो हुकूम दिया, वोह हमे मंजूर है, इस्लाम हमे इज्जत, जस्टिस और आइडेंटीटी देता है. मिया-बीबी मे तलाक होता है, तो वह शादी बंधन मे नही रहते और वह आझाद हो जाते है. इसके कारण औरत पर जुलुम नही होता.इसलीये तीन तलाक बिल वापस लो.

मुंबई : दक्षिण मुंबईतील मुस्लिम बहुल भागातून शनिवारी हिजाबधारी महिलांचे जत्थेच्या जत्थे आजाद मैदानाकड़े निघाले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच हे जत्थे निघालेले पाहण्यात येत होते. काळे बुरखे (हिजाब) परिधान केलेल्या महिलांच्या तोंडी एकच विषय चर्चिला जात होता, तो म्हणजे "तीन तलाक".

याच संदर्भा मुस्लिम समाजातील महिलांना अनिष्ट अशा तीन तलाक अशा दुष्ट चक्रातुन सोडविण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन तलाक विधेयकाच्या माध्यमातून कायदा आणण्यात येणार आहे. परंतु कायदयाचा मुस्लिम महिलांना फायदा होण्याऐवजी मुस्लिम समाजातील महिलांच्या विरोधात हा कायदा जाण्याचा जास्त धोका असल्याचे सांगत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या हिजाबधारी महिला विभागाने मोर्चा काढत आपला विरोध दर्शविताना 'तलाक' तो एक बहाना है l 'शरियत' पे निशाणा है ll अशा गगनभेदी घोषणा देत केंद्र सरकार विरुद्ध एल्गार पुकारला.

सदर येऊ घेतलेल्या कायद्याबाबत कट्टर मुस्लिम धर्मियांनी विरोधी प्रतिक्रिया देत समाजात मुस्लिम धर्मिय "शरीया कायदाच" श्रेष्ठ असल्याचे सांगितले. तर काही मुस्लिम संघटनांचा या कायदयास (विधेयक मंजुरीला) उघड़ पाठिंबा आहे. त्यांनी या कायदयाचे स्वागत तेव्हाच केले. याच संदर्भात परस्पर विरोधी प्रतिक्रिया मुस्लिम स्त्री पुरुषयांच्या मनात या बद्दल उमटत आहेत.

मुस्लिम पर्सनल ल़ॉ बोर्डच्या महिला ब्रँचने 'कूल जमात' या संघटनेच्या वतीने या विधेयकाच्या विरोधात आजचा मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी 12 वाजल्यापासून आझाद मैदानाच्या समोरील रस्त्यावर महिलांनी जमा होण्यास सुरुवात केल्याने मेट्रोकड़े जाणाऱ्या मार्गावर ट्राफिक जाम झाला होता. आजच्या मोर्च्यातील एक अत्यंत महत्त्वाची उठावदार आणि नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे या मोर्च्यात फक्त आणि फक्त महिलांचा सहभाग आणि आवाज घुमत होता. काही षोडशी कन्याही यात दिसून येत होत्या. महिलांनी हातात फलक घेतले होते. मुस्लिम महिला विरोधी तीन तलाक विधेयक मागे घ्या. शरीयत कायद्यात ढवळाढवळ करू नका आणि मुस्लिम महिलांना त्यांच्या हक्कापासून वंचित करण्याचे थांबवा असे इशारे त्यात लिहिले होते. व्यास पीठावर मुस्लिम महिलांच्या शिवाय कोणीही पुरुष प्रतिनिधी उपस्थित नव्हते. सारा तामझाम फक्त महिलांच्या हातात होता.

या वेळी मुस्लिम महिला मोनिका बुशरा म्हणाल्या की, "इस कानून की वजह से कोर्ट-कचेरी मे चक्कर काटना पडेगा, तलाक के लिये 10-10 साल लागेगे, जुठ-मूठ मर्दोंके साथ रहना पडेगा, मर्द औरतोंको जुल्म और अत्याचार करेंगे, औरतोंको जलाया जायेगा."इसलीये शरियत पे हम आच नही आने देंगे. हम शरियत से खुश है, शरियत हमारी जान है, हम आवाम से खुश है. आझादी के बाद यह सबसे बडा आंदोलन है.
वकीली व्यवसायात अग्रेसर असलेल्या मुलावरा अलवारी (कोकण यूनाइटेड फोरम-वाशी) म्हणाल्या की, पर्सनल लॉ बोर्ड हा सरकारने मंजूर केला अशाने मुस्लिम समाजावर घोर अन्याय होणार आहे, ते आम्ही होऊ देणार नाही. शरियात मध्ये कोणताही बदल करण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. शरिया लॉ मुस्लिम महिलांना संरक्षण, सम्मान देतो. जर हा कायदा पास झाला तर त्या महिलेची, मुलांची जबाबदारी कोण घेणार. सरकारने कायद्याचा अभ्यास न करता बिल पास केले आहे,आणि घाईत निर्णय घेतला, हे बिल सरकारने लागू करू नये.तर डॉ.अस्मा जाहिरा(हैद्राबाद- मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मेंबर)यांनी आपले मत मांडताना म्हटले की, लोकसभा मे जल्दबाजी मे ये बिल पास किया है, हमारा मशवरा तक नही लिया गया. तीन तलाक तो बहाना है, शरियत पे निशाणा है.

हमारी जमात मे छोडी हुई औरत ना के बराबर है. बेवा विधवा - तलाकशुदा औरतोंको आश्रम पुरे मुल्क मे नही है. शरियत हमारा दुनियाका बेहतरींन कानून है, यह औरतोंकी इज्जत करता है. हमे शरियत पर फ़क्र और नाझ है. हम यहा पे शरियत के मोहबबत के खातीर आये है.असे प्रतिपादन केले. आशिया शकील साहीबा (जमाते इस्लाम हिंद /मीडिया इंचार्ज) यांनी म्हटले की, इस्लाम ने हमे जो हुकूम दिया, वोह हमे मंजूर है, इस्लाम हमे इज्जत, जस्टिस और आइडेंटीटी देता है. मिया-बीबी मे तलाक होता है, तो वह शादी बंधन मे नही रहते और वह आझाद हो जाते है. इसके कारण औरत पर जुलुम नही होता.इसलीये तीन तलाक बिल वापस लो.

आजच्या या मुस्लिम महिलांच्या आझाद मैदानातील धडकेने केंद्र सरकार हलले असावे असे म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही,कारण जवळ पास तीस हजारांवर महिलांची उपस्थिती जाणवत होती.मुंबई तसेच बाहेर गावाहुन लक्झरी बसेस करून महिलांना मोर्चा यशस्वी करण्यासाठी आणले होते हे उघड़पणे दिसून येत होते.त्यात किती उत्स्फूर्तपणा होता याचा अंदाज बांधने कठिण होते. वडाळा एमबीपीटी कन्टेनर रोडवर मोठ्या प्रमाणात लैक्झरी बसेस एका बाजूला पार्क करण्यात आल्याचे दिसून येत होते.त्या मुळे येथील वाहतूक दिवसभर संथपणे सुरु होती. संध्या काळी 7:30 च्या दरम्यान हा रस्ता मोकळा झाला, कारण याच लक्झरी बसेस मधून मोर्चेकरी महिलांच्या परतीचा प्रवास सुरु झाला होता.

Web Title: muslim womens agitation for triple talaq in Mumbai