नगरमधील बनावट दारू प्रकरणी सीआयडी चौकशी करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मार्च 2017

मुंबई - नगरमधील बनावट दारू प्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत स्पष्ट केले. या बनावट दारूमुळे 9 जणांना प्राण गमवावे लागले. यावरील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणात सरकार गंभीर असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

विजय वडेट्टीवार, देवयानी फरांदे, शिवाजी कर्डिले, हरीश पिंपळे आदी आमदारांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमांतून विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बावनकुळे यांनी वरील माहिती विधानसभेत दिली. बनावट दारूप्रकरणी मुख्य आरोपी दादा वाणी याला अटक केली असून, एकूण 18 आरोपींपैकी 16 जणांना अटक केली आहे. दोन आरोपी फरार आहेत. या प्रकरणी उत्पादनशुल्क विभागातील सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यात एक उपअधीक्षक, दोन दुय्यम निरीक्षक आणि तीन जवानांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

या प्रकरणात जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये शासनातर्फे देण्यात आले आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालयातील उपाहारगृहांची तपासणी करण्यात येणार असून, नियमबाहय बाबी आढळल्यास कारवाईची शिफारस करण्यात येणार आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी दादा वाणी याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई केल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले.

Web Title: nagar bogus wine cid inquiry