चोरट्याने युवतीला लोकलमधून फेकले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

नालासोपारा - महिलांच्या डब्यात घुसलेल्या चोरट्याने एका युवतीला धावत्या लोकलमधून फेकल्याची घटना काल (ता. 7) रात्री नालासोपारानजीक घडली.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कोमल चव्हाण (19) हिच्यावर विरार येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोमल हिच्या खांद्याला आणि गुडघ्याला जबर मार लागला असून, तिच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. घटना घडली तेव्हा त्या डब्यात पोलिस नव्हता, असे उघड झाले आहे. कोमलने गुरुवारी रात्री कामावरून सुटल्यानंतर विरार स्थानकातून चर्चगेटला जाणारी लोकल पकडली. महिलांच्या डब्यात त्या वेळी कोणीही नव्हते. अचानक त्या डब्यात घुसलेल्या चोरट्याने तिच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने कोमलला खाली ढकलून दिले.