विरारमध्ये बाप-लेकाचे दुहेरी हत्याकांड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

नालासोपारा - विरार येथून सोमवारी दुपारी बेपत्ता झालेल्या बाप-लेकाची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे आज स्पष्ट झाले. दहिसर गावातील तलावात काल मुलाचा मृतदेह सापडला असतानाच आज विरारमधील म्हाडा कॉलनी येथील नाल्यातून पित्याचाही मृतदेह सापडला.

दोन्ही मृतांच्या तोंडाला सेलोटेप लावून हात-पाय बांधलेले होते. या दोघांनाही पूर्वनियोजित कटातून ठार मारण्यात आले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

चंद्रकांत तुकाराम करगल (वय 45) व हर्ष चंद्रकांत करगल (वय 10) अशी मृतांची नावे आहेत. ते विरार पूर्व येथील सहकारनगरमध्ये राहत होते.

सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास चंद्रकांत मुलाला शाळेतून आणण्यासाठी घराबाहेर पडले होते; पण ते रात्री उशिरापर्यंत न परतल्याने त्यांच्या पत्नीने रात्री विरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काल दहिसर तलावात हर्षचा मृतदेह सापडला. त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली होती. या तलावात चंद्रकांत यांचाही शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र आज दुपारी म्हाडा कॉलनीमधील मोठ्या नाल्यात चंद्रकांत यांचा मृतदेह सापडला. सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर दोन्ही मृतदेह फेकून देण्यात आल्यामुळे हत्येचे गूढ वाढले आहे. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.