नवी मुंबई पालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

बेलापूर - पावसाळ्यात आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ आणि विभाग स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, हे नोडल अधिकारी नेमून दिलेल्या विभागात संबंधित विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी मदत करणार आहेत. 

बेलापूर - पावसाळ्यात आपत्कालीन व्यवस्थापन सक्षम होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ आणि विभाग स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, हे नोडल अधिकारी नेमून दिलेल्या विभागात संबंधित विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी मदत करणार आहेत. 

शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी नवी मुंबईतील सरकारी, निमसरकारी अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेतला होता. त्यानंतर पालिका परिमंडळ स्तरावर नोडल अधिकारी म्हणून परिमंडळ एकसाठी उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ दोनसाठी उपायुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांची नेमणूक केली आहे. विभाग कार्यालय स्तरावर संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंत्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. यात बेलापूरसाठी अजय संख्ये, नेरूळमध्ये सुभाष सोनावणे, वाशीत अरविंद शिंदे, तुर्भेत मनोज पाटील, कोपरखैरणेत संजय देसाई, घणसोलीत अनिल नेरपगार, ऐरोलीसाठी शरद काळे व दिघा येथे गिरीष गुमास्ते यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. नवी मुंबई महापालिकेने आपत्ती उद्‌भवू नये यासाठी काळजी घेतली असून नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. 

संपर्क क्रमांक 
- सीबीडी बेलापूर पालिका मुख्यालय टोल फ्री क्रमांक - 1800222309/1800222310 
- वाशी अग्निशमन केंद्र - 2789 4800/27895900 
- ऐरोली अग्निशमन केंद्र - 27795200/27792400 
- नेरूळ - 27707101 
- बेलापूर अग्निशमन केंद्र - 27572111 

विभाग कार्यालये 
बेलापूर - 27570610 
नेरूळ - 27707669 
वाशी - 27655370 
तुर्भे - 27834069 
कोपरखैरणे - 27542449 
घणसोली - 27698175 
ऐरोली - 27792114 
दिघा - 27792410 

Web Title: Navi Mumbai Municipal Emergency Control Room