स्मार्ट सिटीचे... स्मार्ट पार्किंग! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

नवी मुंबई  - शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने स्मार्ट पार्किंग धोरण तयार केले आहे. यात वाहनचालकांना मोबाईलवर बसल्या जागी वाहनतळाची माहिती मिळणार आहे. महापालिकेने यासाठी शहरातील 14 भूखंडांची निवड केली असून, सध्या शहरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या सम-विषम पार्किंगचाही यासाठी वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या फुकट्यांनाही पैसे मोजावे लागणार आहेत. 

नवी मुंबई  - शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने स्मार्ट पार्किंग धोरण तयार केले आहे. यात वाहनचालकांना मोबाईलवर बसल्या जागी वाहनतळाची माहिती मिळणार आहे. महापालिकेने यासाठी शहरातील 14 भूखंडांची निवड केली असून, सध्या शहरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या सम-विषम पार्किंगचाही यासाठी वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या फुकट्यांनाही पैसे मोजावे लागणार आहेत. 

नवी मुंबईची दर दहा वर्षांनी साधारण 25 टक्के लोकसंख्यावाढ गृहीत धरून 2031 पर्यंतची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यात होणारी वाढ लक्षात घेऊन हे धोरण ठरवले आहे. सध्या नवी मुंबईत आरटीओकडे नोंदणीकृत असलेली तब्बल तीन लाख 51 हजार 620 वाहने रोज रस्त्यांच्या कडेला उभी आहेत. त्यासाठी पालिकेने काही भागात सम-विषम, नो-पार्किंग, रस्त्याच्या दुतर्फा समांतर पार्किंग असे नियोजन केले आहे; मात्र शहरातील वाहनांच्या संख्येत 10 ते 13 टक्‍क्‍याने वाढ होण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. प्रशासनाने काढलेल्या अंदाजानुसार साधारणपणे एक वाहन दिवसाला एक तास धावत असून, उर्वरित 23 तास रस्त्यावर उभे असते. भविष्यात अशा वाहनांसाठी वाहनतळाची सोय न केल्यास वाहतूक कोंडी फोडणे अवघड होईल. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून स्मार्ट पार्किंग धोरण राबवले जाणार आहे. तंत्रज्ञानाची मदत घेऊन वाहनचालकांना मोबाईलवर पार्किंगची माहिती, दर उपलब्ध व्हावे, अशी सोय केली जाणार आहे. 

स्मार्ट पार्किंग म्हणजे काय? 
रिअल टाईम ऍव्हेलिबिलिटी ऑफ पार्किंग प्लॉट टू युजर्स, हाय स्पीड गेट्‌स सेफ्टी ऍण्ड पार्किंग, ऑटोमॅटिक तिकीट डिस्पेंसर, आयपी बेस्ड कॅमेरा, एनएफसी प्रॉक्‍सिमिटी रिडर कार्ड, स्मार्ट टी टक्‍स, असिस्टिंग ट्रॉफिक फॉर अनॉराईज्ड पार्किंग, स्मार्ट रेग्युलेटेड पार्किंग, पब्लिक ऍक्‍सेस, वन क्‍लिक ऍक्‍सेस टु इन्फोर्मेशन, जीपीएस ट्रेकर, कार फाईन्डर, लाईट मोशान सेन्सर, मॅग्नेटिक ऍण्ड अल्ट्रासॉनिक सेन्सर अशा प्रकारची अद्ययावत उपकरणे बसवलेले वाहनतळ म्हणजे स्मार्ट पार्किंग. मोबाईल ऍप्सच्या माध्यमातून इंटिग्रेटेड पार्किंग गुगलद्वारे वाहनचालकांना कळणार आहे. 

कोट्यवधींचे उत्पन्न 
स्मार्ट पार्किंग राबवण्याचा खर्च पूर्णपणे संबंधित कंत्राटदाराला करावा लागणार आहे. पार्किंगच्या उत्पन्नाचा काही टक्के भाग पालिकेला द्यावा लागणार आहे. पाच व सात वर्षांसाठी 53 कोटी 88 लाख, तर 10 वर्षांसाठी 56 कोटी 57 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. यातून पाच वर्षांत आठ कोटी 12 लाख, सात वर्षांत 18 कोटी तर 10 वर्षांत 41 कोटी 70 लाख इतके उत्पन्न मिळणार आहे. 

वाहनतळाचे दर 
चारचाकी वाहनांना दोन तासांसाठी 50 रुपये, दुचाकींना दोन तासांसाठी 20, ट्रक व अवजड वाहनांना दोन तासांसाठी 200 रुपये व अतिरिक्त तासांसाठी प्रतितास 80 रुपये आकारले जाणार आहेत. 

रस्त्यांवरील पार्किंगसाठीही पैसे 
सोसायटीच्या बाहेरील रस्त्यावर सर्रासपणे पार्किंग करणे आता महागात पडणार आहे. सोसायटीच्या बाहेरच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्यांकडून महापालिका पैसे घेण्याच्या विचारात आहे. अशा वाहनांसाठी रात्री 10 ते सकाळी 8 या दहा तासांसाठी दर ठरवण्यात आले आहे. दुचाकीला महिन्याला दीड हजार, चारचाकी वाहनांसाठी साडेचार हजार, ट्रक, बस, मल्टिएक्‍सेल वाहनांसाठी आठ हजार मोजावे लागणार आहेत.

Web Title: Navi Mumbai Municipal Parking Scheme