नवी मुंबई पोलिसांचे  पगार रखडले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

नवी मुंबई - नवी मुंबई पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार अद्याप मिळाला नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. मार्चअखेर प्रलंबित कामांचा निपटारा आणि पोलिस भरतीची प्रक्रिया या कामाच्या धबडक्‍यातून पगाराची बिले कोकण भवन येथील उपकोषागार कार्यालयात वेळेवर सादर करूनही खात्यात पगार जमा झालेला नाही. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाची मागील भरतीची व पीसीपीआरसह अन्य कामांची बिलेही अद्याप ट्रेझरी ऑफिसने मंजूर केलेली नाहीत, अशी माहिती मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त प्रवीण पवार यांनी दिली. 

दरम्यान, नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने यापूर्वीच्या सादर केलेल्या बिलांमधील लेखा आक्षेपाची पूर्तता होत नाही, तोपर्यंत नवीन बिले यंत्रणेमध्ये स्वीकारली जात नाहीत. आयुक्तालयाची आक्षेप असलेली बिले आज सिस्टिममधून काढली आहेत. त्यामुळे पोलिसांच्या खात्यात पगार जमा होतील, असे उपकोषागार अधिकारी (ट्रेझरी ऑफीसर) शरद जाधव यांनी सांगितले. मार्चअखेरची अनेक सरकारी कार्यालयांच्या प्रलंबित बिलांचा निपटारा करणे आवश्‍यक असल्याने एक-दोन दिवसांत पोलिसांचे पगार निघतील, असे ते म्हणाले. 

सर्वसाधारणपणे 1 ते 3 तारखेपर्यंत पोलिसांना पगार मिळतो; परंतु या वेळी 13 तारीख उजाडली तरी त्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे गृहकर्जाचे हप्ते, मुलांची शाळेची फी आणि घरखर्च कसा चालवायचा, असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. 

Web Title: Navi Mumbai police's salary stops