जुन्या योजनांचे नाव बदलून चालवण्याची मोदींवर नामुष्की : नवाब मलिक

nawab malik
nawab malik
मुंबई : मोदी सरकारने मोठा गाजावाजा करीत नोटाबंदी, जीएसटी आणले. मात्र सरकार फसले त्यामुळे देश आर्थिक संकटात लोटला गेला. आता हेच अपयश झाकण्यासाठी मोदी सरकारवर नामुष्की ओढवली आहे. त्यासाठी मागील सरकारच्या चांगल्या योजनांचे नाव बदलणे सुरु केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज (मंगळवार) केला.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सुरु केलेली सौभाग्य योजना ही मागील सरकारने म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण या नावाखाली सुरु केली होती. या योजनेतून देशात 31मे जानेवारी 2013 पर्यंत दोन कोटी पाच लाख लोकांना मोफत विजेची जोडणी देण्यात आली होती. या योजनेमुळे गोरगरिबांना फायदा झाला होता. परंतू मागील साडेतीन वर्षात मोदी सरकारने गरीब जनतेला लाभ होईल अशी एकही योजना आणली नाही, नोटबंदीने देशातील अर्थव्यवस्था कोलमडली, हे सर्व अपयश झाकण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे,' असे मलिक म्हणाले. 

दरम्यान, देशात कोळशामुळे विजेचे उत्पादन थांबलेले नाही, देशात अधिकची वीज उपलब्ध आहे,असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले, त्या विधानावरही मलिक यांनी जोरदार हल्ला चढवला. आज राज्यात कोळसा नसल्याने वीज उत्पादन करणारे अनेक संच बंद आहेत. जर देशात अधिकची वीज असेल तर मग महाराष्ट्र सरकार राज्यात आठ-नऊ तास लोड शेडिंग का करत आहे, असा सवालही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com