राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नवी मुंबईतून श्रीगणेशा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

नवी मुंबई - कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल वाजले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी (ता. 6) प्रचार सभा घेणार आहेत. कोकण पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी त्यांची सभा होणार आहे. कोकण मतदार संघात वाशी हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे नवी मुंबईतूनच राष्ट्रवादीच्या प्रचाराचा श्रीगणेशा होणार आहे. 

या निवडणुकांसाठी 25 जूनला मतदान होणार असून 28 तारखेला निकाल घोषित होणार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पालघर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यामुळे राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यासाठी पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची निवड केली आहे. शिवसेना व भाजपच्या उमेदवारांपेक्षा जास्त मते मिळवण्यासाठी राष्ट्रवादीला ठाण्यासह पालघर व सिंधुदुर्गमध्ये ताकद पणाला लावावी लागणार आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीने कॉंग्रेस, शेकापसह इतर पक्षांनी महाआघाडी केली आहे. 

शिवसेना उमेदवारांचा आज अर्ज 
कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेकडून संजय शिंदे हे बुधवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोकण भवन येथे येणार आहेत. त्या वेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असणार आहेत. 

Web Title: NCP campaign starting in Navi Mumbai