'हे भांडण नवरा-बायकोसारखे'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

ठाणे - शिवसेना आणि भाजप या पक्षांचे भांडण म्हणजे नवरा-बायकोमधील भांडणासारखे आहे. एकमेकांवर रुसवे-फुगवे काढून हे दोन्ही पक्ष काही दिवस भांडतील, एकमेकांची उणीदुणी काढतील; पण काही दिवसांनी माहेरी गेलेली बायको पुन्हा माघारी येते, तसेच यांचे आहे. सत्तेसाठी आणि लाल दिव्यासाठी हे दोघे पुन्हा मांडीला मांडी लावून बसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या नौटंकी भांडणाला महत्त्व का देता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाण्यात गुरुवारी (ता.१६) घेतलेल्या रॅलीत केला. 

ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी फिरताना गाड्यांच्या ताफ्याला फाटा देत दुचाकीवरून जाणे पसंत केले. रॅलीवेळी ठिकठिकाणी केलेल्या भाषणांमध्ये सुळे यांनी शिवसेना-भाजपवर कडाडून टीका केली.ठाणे आणि मुंबई या शहरांचा युतीने बोजवारा उडवला आहे. नियोजनशून्य कारभार केला आहे. त्याचा फटका येथील सर्वसामान्यांना बसतो आहे. सर्वच ठिकाणची नागरिक त्रासलेली आहे. त्याचा बदला ती या निवडणुकांमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही.  वाहतूक कोंडीमुळे कमी वेळात सगळीकडे फिरायला वेळ लागतो. म्हणून मोटरसायकलने प्रचार करते, असे त्यांनी सांगितले.

मुंबई

विरार - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने मॅजिक फिगर पार करून 61 जागांवर विजयी पताका फडकवली असली, तरी त्यांच्या यशात सिंहाचा...

05.24 AM

मुंबई  - आरे कॉलनीत मेट्रोची कारशेड उभारण्याकरिता 30 हेक्‍टर जागा घेण्याचा आटापिटा सरकार करत आहे; परंतु या व्यवहारात 18...

05.12 AM

मुंबई - कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे रखडलेले निकाल कधी जाहीर करणार, याची माहिती दोन दिवसांत देण्याचे आदेश मुंबई उच्च...

04.30 AM