अर्थव्यवस्थाही साहित्य शैलीत हवी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पु. भा. भावे साहित्यनगरी, डोंबिवली - बदललेली अर्थव्यवस्था आपण स्वीकारली आहे, त्यामुळे समाजाचे झालेले विघटन आपल्यापर्यंत आले आहे. हे सर्वांनी मान्य केले आहे. मराठी साहित्यात त्याचे प्रतिबिंब उमटत आहे, यावर मतभेद आहेत; मात्र मतभेद कमी उमटतात हे मान्य आहे. ते मांडण्याचे पर्याय वेगवेगळे आहेत. बदलत्या काळात अर्थव्यवस्था साहित्याच्या शैलीत तरुण पिढीकडे लेखन कसे नेता येईल, याचा विचार करणे आवश्‍यक असल्याचा सूर ‘बदलती अर्थव्यवस्था : समाजाचे विघटन आणि बदलते लेखन’ या परिसंवादात उमटला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सावित्रीबाई फुले नाट्यगृहात शंकर सखाराम व्यासपीठावर हा परिसंवाद झाला. या वेळी अर्थक्रांतीचे अनिल बोकील, लेखक वीरेंद्र तळेगावकर, पत्रकार सारंग दर्शने, श्रीकांत बारहाते, चंद्रशेखर टिळक व यमाजी मालकर व्यासपीठावर होते. साहित्य संमेलनात प्रथमच अर्थव्यवस्थेवर चर्चा होत असल्याचे तळेगावकर म्हणाले; तर बोकील म्हणाले, व्हॉटस्‌ ॲप, फेसबुक या सोशल नेटकवर्किंगवर सध्या अनेक जण व्यक्त होत आहेत. त्यावर लिहिलेले साहित्य मानायला हवे. श्रम मूल्यापेक्षा आता बौद्धिक मूल्याची किंमत जास्त झाली आहे. दर्शने, तळेगावकर, बारहाते, टिळक, मालकर यांनी विविध मते मांडली.

मुंबई

मुंबई : प्रदूषण नियंत्रण आणण्याचे आव्हान खूप मोठे आहे याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न...

02.48 PM

कल्याण : दोन दिवसानंतर गणपती बाप्पाचे आगमन होणार असून त्यापूर्वी डोंबिवलीकराना डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानकपरिसरमधून केडीएमटी...

02.39 PM

कल्याण : लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसावंर येऊन ठेपले  असल्याने सर्वत्र  उत्साह ओसांडून वाहात आहे. त्यात...

01.57 PM