पाऊण तासाचा प्रवास आता 20 मिनिटांवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

नेरळ - मुंबई-पुण्याहून कर्जत तालुक्‍यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या कर्जत-चौक या एकमेव रस्त्यावर प्रवास करताना अनेक दिव्ये पार पाडावी लागत असत. नऊ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी खड्ड्यांमुळे पावसाळ्यात तब्बल 40 मिनिटांचा अवधी लागत असे. तो आता खड्डे भरल्यामुळे 20 मिनिटांवर आला आहे.

पुढील दोन वर्षांसाठी दोन कोटी रुपये खर्चून रस्त्याचे डांबरीकरण व देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक 6 आणि 7 नोव्हेंबरला कर्जत तालुक्‍यातील खांडपे येथील एका तारांकित हॉटेलमध्ये होत आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 300 हून अधिक प्रदेश कार्यकारिणी सदस्य कर्जतला येणार आहेत. या बैठकीच्या निमित्ताने का होईना; कर्जत तालुक्‍यात येणारा हा रस्ता गुळगुळीत होत असल्याचा आनंद स्थानिकांना झाला आहे.