राष्ट्रवादीची कर्जतमध्ये सोमवारपासून चिंतन बैठक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

नेरळ - राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता. 6) आणि मंगळवारी कर्जतमध्ये चिंतन बैठक होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधातील भूमिका ठरवण्यासाठी प्रदेश कार्यकारिणीत चर्चा करण्यात येणार आहे.

त्यानुसार जनतेच्या प्रश्‍नाबाबत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही बैठक ठरेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. या वेळी आमदार सुरेश लाड, पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे, प्रदेश चिटणीस संजय तटकरे, युवती सेलच्या मुंबई अध्यक्ष अदिती नलावडे, प्रदेश कार्यालयाचे प्रमुख बाप्पा सावंत उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पूर्ण दोन दिवस बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लाड यांनी दिली.