मध्य रेल्वेचे लवकरच नवीन वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

सीएसटी ते कर्जत-कसारा मार्गावरील बदल
मुंबई - मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात नवीन वर्षात फेब्रुवारीपासून बदल करण्यात येणार आहे. सीएसटी ते कर्जत-कसारा या मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल अपेक्षित असून, बहुतांश लोकलच्या वेळा बदलतील. नवीन वेळापत्रकात पाच ते सहा नवीन फेऱ्यांचाच समावेश होणार असल्याने प्रवाशांचा प्रवास सुसह्य होण्याची शक्‍यता नाही.

सीएसटी ते कर्जत-कसारा मार्गावरील बदल
मुंबई - मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात नवीन वर्षात फेब्रुवारीपासून बदल करण्यात येणार आहे. सीएसटी ते कर्जत-कसारा या मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल अपेक्षित असून, बहुतांश लोकलच्या वेळा बदलतील. नवीन वेळापत्रकात पाच ते सहा नवीन फेऱ्यांचाच समावेश होणार असल्याने प्रवाशांचा प्रवास सुसह्य होण्याची शक्‍यता नाही.

उपनगरी मार्गावरील दिवा स्थानकात जलद लोकल थांबवण्यात येणार आहेत. सुरुवातीला या स्थानकात दोन्ही दिशांच्या मार्गांवरील प्रत्येकी 12 गाड्या थांबवण्याचा मध्य रेल्वे विचार करत आहे. या फेऱ्यांमुळे मागे-पुढे असणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. बदलापूर, आसनगाव आणि टिटवाळा या टप्प्यात वाढलेल्या प्रवाशांच्या संख्येचा विचार करून या मार्गावर ठाणे-बदलापूर, ठाणे-आसनगाव अशा शटल सेवा सुरू करण्यासाठीही रेल्वेचे विविध विभाग प्रयत्न करत आहेत. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वेळापत्रकातही मार्च-एप्रिलमध्ये बदल होणार असल्याने या मार्गावर अधिक फेऱ्या चालवण्यासाठी अधिक लोकल गाड्यांची आवश्‍यकता आहे. पश्‍चिम रेल्वेकडून पाच लोकल मिळाल्यास या मार्गावर अधिक गाड्या चालवणे मध्य रेल्वेला शक्‍य होईल.

सध्या मध्य रेल्वे रात्री 11.18 वाजता शेवटची जलद लोकल सोडते. अनेक वर्षांपासून या लोकलच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार रात्री 11.30 ते 12 च्या सुमारास सीएसटी ते कल्याणदरम्यान एखादी जलद लोकल चालवण्याचाही प्रशासन विचार करत आहे; परंतु याच वेळेत सीएसटीहून रात्री 11.30 वाजता अमृतसर, रात्री 11.45 वाजता चेन्नई एक्‍स्प्रेस आणि रात्री 12.10 वाजता महानगरी एक्‍स्प्रेस सुटतात. या गाड्यांचे नियोजन करून या मार्गावर रात्री उशिरा जलद लोकल चालवण्याचाही रेल्वे अधिकारी विचार करत आहेत.

मुंबई

कल्याण : गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळ मोठ्या प्रमाणात महाप्रसाद ठेवतात. यावेळी नागरिकांच्या आरोग्याला घातक...

03.36 PM

सफाळे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 4 वर्षे, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 29 महिने होऊनही सीबीआयपासून...

03.12 PM

ठाणे : सकाळपासुन कोसळत असलेल्या श्रावणसरींनी ठाणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटनांसह वृक्ष उन्मळून...

01.03 PM