ठाण्यात पाणीटंचाईमुळे नवीन बांधकामांना बंदी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

मुंबई - ठाण्यातील घोडबंदर परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर नवीन बांधकामांना परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) पुढील सुनावणीपर्यंत (ता. 9) देऊ नये, असा आदेश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिला. 

ठाणे महापालिका आयुक्त वास्तवाकडे डोळेझाक करू शकत नाहीत. नव्या बांधकामांना परवानगी देऊन नागरिकांना बांधकाम व्यावसायिकांच्या भरवशावर सोडता येणार नाही, असे मत मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात नवी बांधकामे सुरू आहेत; मात्र आधीच परिसरात तीव्र पाणीटंचाई असून, पालिकेने पाणीकपात सुरू केली आहे. असे असताना नवीन बांधकामांना परवानगी देऊन पाण्याचा अपव्यय करण्यापेक्षा बांधकामांना परवानगीच देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका स्थानिक रहिवासी मंगेश शेलार यांनी दाखल केली आहे. पालिकेने या दाव्याचे खंडन केले.