प्रदूषित हवेच्या यादीत नवी मुंबईचाही समावेश 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नवी मुंबई  - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वांत जास्त प्रदूषित हवा असणाऱ्या 17 शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबईसह नवी मुंबई शहराचाही समावेश आहे. त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली असल्याचा आणि गेल्या वर्षापेक्षा धूलिकण कमी झाल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या पर्यावरण स्थिती अहवालावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे महापालिका हवेची गुणवत्ता सुधारल्याचे सांगते; तर दुसरीकडे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब असल्याचे सांगून यादीत समावेश करते. यामुळे कोणता अहवाल खरा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

नवी मुंबईतील जैविक वैविध्य व नैसर्गिक सौंदर्य टिकून राहावे यासाठी महापालिकेने टेरी संस्थेवर जबाबदारी सोपवली आहे. या संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या हद्दीतील नैसर्गिक स्रोतांवर अभ्यास करून त्यांचे कशा प्रकारे संरक्षण करता येईल याबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याच संस्थेच्या माध्यमातून तयार केलेला पर्यावरण स्थिती अहवाल 16 ऑगस्टला सादर करण्यात आला. यात टेरीने नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारल्याचा दावा केला आहे. 2016-17 च्या तुलनेत नवी मुंबईतील हवेतील पर्यावरण गुणवत्ता निर्देशांक व पर्यावरण कामगिरी निर्देशांकात अनुक्रमे 2.7 व 7.9 अंकांनी वाढ झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. शहारातील रस्त्यांचे बांधकाम, कचऱ्याच्या पुनर्वापरावर भर, दगडखानींचे बंद पडेलेले काम, यामुळे नवी मुंबईतील हवा सुधारल्याचा दावा करण्यात आला आहे. 2016-17 मध्ये शहरात सल्फरडाय ऑक्‍साईड, नायट्रोजन ऑक्‍साईड व ओझोन या थरांचे केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या निकषांपेक्षा कमी आहे. मंगळवारी पर्यावरण मंत्री प्रवीण पोटे यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वांत जास्त प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली. यात सर्वांत प्रदूषित 17 शहरांमध्ये नवी मुंबई 13 व्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवी मुंबईची हवा सर्वांत प्रदूषित म्हटली असेल; तर मग टेरी या संस्थेच्या अहवालात नवी मुंबईची हवा सुधारलेली कशी, असा प्रश्‍नचिन्ह पर्यावरणवाद्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

Web Title: new mumbai polluted air noise