नवी मुंबईत दमदार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

कोपरखैरणे - काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवारीही कायम होता. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

संततधार पावसामुळे सोमवारी सकाळी कामावर निघालेले चाकरमानी आणि शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे ठाणे-वाशी हार्बर मार्गावरील लोकल पाच ते 10 मिनिटे उशिराने धावत होत्या. सायन-पनवेल महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. काही ठिकाणी पावसामुळे सिग्नल बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. ठाणे-बेलापूर मार्गावर नोसिल नाका, सविता केमिकल येथे उड्डाणपुलांचे काम सुरू असल्याने तेथे होणारी वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. पाऊस आणि वाऱ्यामुळे शहरात पाच ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. यंदाच्या पावसाळ्यात नवी मुंबईत आतापर्यंत 1728.26 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. 

टॅग्स