निरंजन डावखरे अखेर 'राष्ट्रवादी'मधून बाहेर

Niranjan-Davkhare
Niranjan-Davkhare

मुंबई - कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून आपण वडिलांच्या माध्यमातून पक्षाची जडणघडण पाहिली होती. त्यामुळे पक्ष सोडताना दुःख होत आहे, असे नमूद करीत आमदार डावखरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाबाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. आपली पुढील वाटचाल लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदार डावखरे यांनी आमदारपदाचा राजीनामा आज सुपूर्त केला, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठविला.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात 2012 मध्ये झालेली निवडणूक ऍड. निरंजन डावखरे यांनी जिंकली होती. 'राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पातळीवरील एका गटाकडून सातत्याने डावखरे कुटुंबाविरोधात कारवाया सुरू होत्या. या गटाने 2016 मध्ये झालेल्या विधान परिषदेचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांच्या निवडणुकीतही पक्षविरोधी कारवाया केल्या. मात्र, त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नव्हती. आताही या गटाकडून आपल्याला सातत्याने स्थानिक स्तरावर डावलले जात होते. अखेर या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसबाहेर पडण्याचा निर्णय घेतला,'' असे निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com