उत्तर भारतीयांना मनसेची उमेदवारी 

उत्तर भारतीयांना मनसेची उमेदवारी 

मुंबई - "मराठी माणूस' आणि मराठी मतांचे राजकारण करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका निवडणुकीत सात उत्तर भारतीय चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर मनसेने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता; मात्र तो धुडकावल्यानंतर मनसे स्वबळावर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

मराठीचा डंका पिटणाऱ्या मनसेने मुंबई महापालिका निवडणुकीत परप्रांतीयांची मदत घेतली आहे. परप्रांतीयांचा भरणा अधिक असलेल्या प्रभागांत उत्तर भारतीयांना रिंगणात उतरवले आहे. असल्फा परिसरात प्रभाग 160 मधून शुभ्रांशु दीक्षित यांच्यासह इतर सहा वॉर्डांमध्ये मनसेचे परप्रांतीय उमेदवार आहेत. संबंधित वॉर्डातील परप्रांतीय मतदारांना आकर्षिक करण्यासाठी मनसेने हा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे; मात्र पक्षाचा अजेंडा आणि मराठी माणसासाठीच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नसल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. जन्मभूमी मुंबई नसेल; पण कर्मभूमी मुंबई असलेल्या उत्तर भारतीयांना उमेदवारी दिल्याचे मनसेने स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com