नोटा ठरणार महत्त्वाचा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत नकाराच्या अधिकाराला अनेक मतदारांनी आपली पसंती दिली होती. प्रभागातील एकही उमेदवार मतदाराला पसंत नसल्यास तो ‘राईट टू रिजेक्‍ट’ म्हणजेच ‘नोटा’ हे बटन दाबून आपली नापसंती दर्शवू शकतो. कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत नऊ हजार ४३८ मतदारांनी नोटा वापरल्याचे दिसून आले होते. त्यामुळे उल्हासनगर पालिका निवडणुकीत नोटा पर्यायाला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागात नोटाचा प्रभावी वापर झाला होता. बहुतांश ठिकाणी कमी मतांच्या फरकाने उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे उल्हासनगरमध्येही नोटाचा प्रभावीपणे वापर झाल्यास त्याचा फटका उमेदवारांना बसू शकतो. उल्हासनगरमध्ये मतदानाची टक्केवारी वाढत आहे; मात्र यंदा मतदानाचा आलेख वाढला, तरी किती मतदार नोटाला पसंती देतात, ही बाब महत्त्वाची आणि निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे.  पसंतीचा किंवा योग्य उमेदवार नसेल, तर मतदानाकडे पाठ फिरवली जायची; परंतु आता नोटाचा अधिकार दिल्यामुळे मतदाराला मतदान करता येते.

महाराष्ट्र पहिले

सर्वोच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबर, २०१३ च्या आदेशानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व नागरिकांना नकाराधिकाराचा पर्याय उपलब्ध झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

मुंबई

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये स्वाईन फ्लूच्या शिरकावामुळे झालेले दोघांचे मृत्यू आणि उखडलेल्या रस्त्यांच्या समस्येवरून सत्ताधारी आणि...

03.27 AM

कल्याण  -दोन दिवसांनंतर गणपती बाप्पांचे आगमन होणार असून त्यापूर्वीच डोंबिवलीतील नागरिकांना डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानक...

02.24 AM

कोपरखैरणे  - नवी मुंबई परिसरात साखळी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना नेरूळ ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सात लाख...

12.27 AM