अभिनेते रजनीकांत यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

मुंबई - सुपरस्टार रजनीकांत यांना भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाचे अध्यक्ष सुंदर शेखर यांनी नोटीस पाठवली आहे.

मुंबई - सुपरस्टार रजनीकांत यांना भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाचे अध्यक्ष सुंदर शेखर यांनी नोटीस पाठवली आहे.

रजनीकांत यांच्या चेन्नईतील घरी गुरुवारी ही नोटीस पाठवण्यात आली. रजनीकांत बनवत असलेल्या चित्रपटात हाजी मस्तान याचा तस्कर व गॅंगस्टर म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हाजी मस्तान या महासंघाचा संस्थापक आहे. या चित्रपटामुळे महासंघाची प्रतिमा खराब होईल, असा आक्षेप नोटीसमध्ये घेण्यात आला आहे.