पोलिसांना हातकड्या घालून पाठवायचे का?- उद्धव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 सप्टेंबर 2016

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. पोलिसांवर होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी, पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच पोलिसांचे काम करण्याचे तास कमी करावेत अशा अनेक मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशा मागण्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्याकडे केल्या.

उद्धव ठाकरेंनी मांडलेले मुद्दे -

- गेल्या काही दिवसांत पोलिसांवर होणारे हल्ले वाढलेत

- समाजात पोलिसच असुरक्षित असतील, तर आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत याचा विचार केला पाहिजे

- पोलिसांना आपण हातात हातकड्या घालून ड्युटीवर पाठवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

- पोलिसांच्या कुटुंबीयांनी माझी भेट घेतल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची विनंती केली होती त्याप्रमाणे मुख्यमंत्री आज आम्हाला भेटले. 

- पोलीस कुटुंबीयांनी आपल्या समस्या स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. 

- पोलिसांच्या केसाला धक्का लागता काम नये, पोलिसांवर जो कुणी हल्ला करेल त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे

- आम्ही विरोधी पक्षात असताना ज्या मागण्या केल्या होत्या, त्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 

- पोलिसांच्या कुटुंबियांना समाविष्ट करून एक समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये पोलिस कुटुंबिय, सरकारचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी असणार आहेत. 

- या समितीच्या माध्यमातून पोलिसांच्या समस्यांचा आढावा घेऊन पुढील मार्ग काढला जाईल

- पोलिसांच्या घरांचा प्रश्न, अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांचा प्रश्न तसेच पोलिसांबाबत एखादी दुर्घटना घडली तर तात्काळ जवळच्या चांगल्या रुग्णालयामध्ये त्यांना उपचार मिळावेत याविषयी चर्चा झाली. 

- मुख्यमंत्री फडणवीस चांगले आहेत पण त्यांचा व्याप खूप मोठा आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा कारभार स्वतंत्र असावा असे माझे स्पष्ट मत आहे. 

- सरकार माझं आहे असा संदेश पोलिसांमध्ये गेला पाहिजे

- कल्याण-डोंबिवली परिसरात पोलीस अधिकाऱ्याला तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी संबंधितांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता लवकरात लवकर कडक कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Now, police needs protection in Maharashtra, says Uddhav Thackray