अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुटी पालिकेकडून रद्द

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017
मुंबई - पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी अतिरिक्त आयुक्तांपासून सर्व अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरवल्यानंतर आता 15 जूनपर्यंत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रद्द केल्या आहेत. सुटी हवीच असेल तर ती थेट आयुक्तांकडेच मागावी लागणार असल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

महापालिकेत राजकीय अस्थैर्य असल्याने यंदाच्या पावसाळ्यात राजकीय वादळ घोंघावणार आहे. या वादळाचा फटका महापालिका प्रशासनाला बसू नये यासाठी आयुक्त मेहता यांनी कंबर कसली आहे. आयुक्तांनी सर्व अतिरिक्त आयुक्तांपासून नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता आयुक्तांनी पावसाळी कामांशी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. 15 जूनपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या, तसेच प्रस्तावित रजा रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. सुटी आवश्‍यकच असेल तर थेट आयुक्तांकडूनच मंजूर करून घ्यावी लागेल, असे परिपत्रकात म्हटले आहे.

मुंबई

मुंबई - "फेमा' कायद्याचा भंग केल्याबाबत ईडीच्या नोटिशीनंतर बुधवारी अभिनेता शाहरूख व गौरी खान यांचे वकील अंतिम सुनावणीसाठी...

01.39 AM

मुंबई - शाळा व महाविद्यालयांकडून व्यावसायिक दराने वीजदर न आकारता घरगुती दर लावावेत, अशी मागणी शिक्षक परिषदेने सरकारकडे केली...

01.39 AM

दादर - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानचा एल्फिन्स्टनमधील सेनापती बापट मार्गावरील मीनाताई ठाकरे मच्छीमार्केटच्या परिसरात...

01.30 AM