जुन्या नोटा जप्तीप्रकरणी सीबीआय चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई - जुन्या नोटा बॅंकांत जमा करण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी जुन्या नोटा जप्त करण्यात येत आहेत. हे प्रकार बॅंकांमार्फत सुरू असून, त्यात बड्या सरकारी अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शुक्रवारी केली.

पोलिसांनी ठाण्यात दोन कोटी 25 लाख, तर पुण्यात एक कोटी 36 लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता आहे. बड्या सरकारी अधिकाऱ्यांसह केंद्रीय स्तरावरील अधिकारी त्यात सामील असू शकतात. त्यामुळे ही प्रकरणे "सीबीआय'कडे द्यावीत, अशी मागणी सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. जुन्या नोटा बदलून देण्यासाठी टक्केवारीही सुरू असल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, तरच मुख्य सूत्रधारापर्यंत पोचता येईल, असेही ते म्हणाले.

काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. भाजप शेतकऱ्यांचा केवळ निवडणुकीसाठी वापर करीत आहे, असा आरोपही सावंत यांनी केला. "नाफेड'ने राज्यातील केंद्रांवर तूरडाळीची खरेदी बंद केली आहे. शेतकऱ्यांना हमीभावही देण्यात येत नसल्याने ते व्यापाऱ्यांकडे जात आहेत. सरकारच्या उदासीनतेमुळे हे सुरू आहे, अशी टीकाही सावंत यांनी केली.

Web Title: old currency seized cbi inquiry