ओम पुरी यांचा मृत्यू संशयास्पद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांचे जबाब नोंदवले आहेत. पुरी यांची पत्नी, मुलगा, चालक, चित्रपट निर्माते खालिद किदमई यांचा यात समावेश आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर त्यावर अधिक प्रकाश पडेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. व्हिसेरा अहवाल महत्त्वाचा असून, त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता का, हे त्यातून स्पष्ट होईल. आम्ही सर्व बाजूंनी तपास करणार आहोत. निर्माते किदमई यांचा जबाब महत्त्वाचा आहे. त्यांच्या माहितीवरून हा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.