दीड कोटीचे कोकेन जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

मुंबई - केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) सोमवारी (ता. 3) येथील छत्रपती शिवाजी विमानतळावर दीड कोटी रुपयांचे कोकेन घेऊन आलेल्या एका महिलेला अटक केली. 

या महिलेने आणलेले दीड कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. ही महिला भारतीय नागरिक असून, ती लोम (बल्गेरिया) वरून मुंबईला आली, अशी माहिती एनसीबीचे विभागीय संचालक कुमार संजय झा यांनी दिली. 

खियांगते लालथ्लामुआनी असे या महिलेचे नाव आहे. एनसीबीच्या भरारी पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्या बॅगेची तपासणी केली असता, दारूच्या बॉक्‍समध्ये 71 टॅबलेट सदृश्‍य वस्तू सापडल्या. ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला एनसीबीने अटक केली. तिच्याकडे सापडलेले कोकेन दोन किलो 850 ग्रॅम इतके आहे. त्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. ही महिला इथिओपिअन एअरलाईन्सने मुंबईत आली. 

Web Title: One and a half crore of cocaine seized

टॅग्स