दादरमध्ये बस उलटून 1 ठार, 35 जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

या अपघातानंतर दादर भागातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

मुंबई : रत्नागिरीहून मुंबईत येणारी खासगी बस उलटली. या बसमधील 35 जण जखमी झाले आहेत, तर एकजण ठार झाल्याचे वृत्त आहे. 

दादरनजीक आज (रविवार) सकाळी ही घटना घडली. पलटी झालेल्या या बसमध्ये जवळपास 45 प्रवासी होते. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी केईएम आणि सायन रूग्णालयात आणण्यात आलं आहे. या अपघातानंतर दादर भागातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. याप्रकरणी बसच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.